मुंबई: सोमवारच्या मोठ्या तेजीनंतर प्रॉफिट बुकिंगमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार निर्देशांकात मोठी घसरण झाली. आजच्या व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स १,२८१.६८ अंकांनी म्हणजेच १.५५ टक्क्यांनी घसरून ८१,१४८.२२ वर आणि निफ्टी ३४६.३५ अंकांनी म्हणजेच १.३९ टक्क्यांनी घसरून २४,५७८.३५ वर बंद झाला.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे विनोद नायर म्हणाले की, सोमवारच्या मोठ्या तेजीनंतर आज बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आली. जागतिक आणि देशांतर्गत जोखीम कमी झाल्यामुळे (व्यापार युद्धातील तणाव कमी आणि भारत-पाक भू-राजकीय तणाव कमी) काही प्रमाणात दिलासा मिळताना दिसत आहे. मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मीडिया आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी आघाडी घेतली तर आयटी, ऑटो, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांनी निर्देशांकात घसरण नोंदवली. (एएनआय)