हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बस्ती (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
शेतकऱ्यांच्च्या ऊस बिलांची थकबाकी आणि कामगारांचे वेतन देण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी गोविंद नगर साखर कारखान्याच्या प्रदेशद्वारावर सुरू असलेले आंदोलन अकराव्या दिवशीही सुरूच राहिले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांपैकी राम प्रकाश चौधरी, भारतीय किसान युनियनचे गनी रकाम चौधरी आणि शेतकरी हरिशंकर यांची प्रकृती बिघडली.
आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती तातडीने आरोग्य केंद्राला देण्यात आली. आरोग्य विभागाच्या टीमने तिघांच्याही प्रकृतीची तपासणी करून औषधोपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी अमर लाल चौधरी, राम जग, संजय शर्मा, सतीश चौधरी आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा त्यांनी दिला.
भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष राम मनोहर चौधरी म्हणाले, ‘मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन सुरूच राहिले. दिवसभर कडक ऊन आणि रात्री डासांचा उपद्रव अशा स्थितीत आंदोलन सुरू राहिल्याने कार्यकर्ते आजारी पडत आहेत. आंदोलनास भेट देण्यासाठी आलेल्या एसडीएम श्रीप्रकाश शुल्क यांनी येथे सुविधा देण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.’
यावेळी अंगद वर्मा, धर्मेंद्र चौधरी, विजयपाल चौधरी, आज्ञाराम चौधरी, मनोहर चौधरी, बुद्धि सागर आदींसह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.











