पुणे : ‘विघ्नहर’च्या शेतकऱ्याने पिकवला ४३ कांड्याचा ऊस, चेअरमन शेरकर यांनी केले कौतुक

पुणे: विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी विक्रम तट्टू यांच्या शेतीची पाहणी केली. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सचिन पाटील, विलास तट्टू आणि ऊस विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. विक्रम यांनी आपल्या ३ एकर क्षेत्रात ८६०३२ जातीच्या आडसाली ऊस शेतीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांनी योग्य नियोजन आणि कष्टाच्या जोरावर एक ऊस सरासरी ४३ कांड्यांपर्यंत वाढवण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीचे चेअरमन शेरकर यांनी कौतुक केले. इतर शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. चेअरमन सत्यशील शेरकर यांनी तट्टू यांच्या कष्टाचे अभिनंदन करत, कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

विक्रम तट्टू यांनी जुलै २०२४ मध्ये साडेचार फुटांच्या सरी सोडून, दोन डोळ्यांच्या पद्धतीने घरच्या बियाण्याची लागवड केली. त्यांना एकरी केवळ ५० हजार रुपये खर्च आला असून, पहिल्या एकरच्या तोडणीतून १०१ टन उत्पादन मिळाले आहे. संपूर्ण ३ एकरातून ३०० ते ३२५ टन उत्पादन मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. शेतामध्ये त्यांनी एकरी एक ट्रक शेणखतासह कारखान्याच्या प्रयोगशाळेतील जीवाणू खते आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केला. तसेच ड्रोनद्वारे फवारणी करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. विक्रम यांना खर्च वजा जाता सुमारे ९ लाख रुपयांपर्यंत नफा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सांगितले. तर शेरकर यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोड चालू असलेल्या विविध शेतकऱ्यांच्या प्लॉट्सना शेतकी विभागाच्या सहकाऱ्यांसमवेत भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या जात असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here