पुणे : आलेगाव पागा(ता. शिरूर)येथील गुऱ्हाळ चालकाला कामाला मजूर आणून देतो, असे सांगून पाच लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल मालचे (रा.खामखेडा, ता.धरणगाव), रामा भिल, बापू भिल, शांताराम भिल, गोरख भिल, नाना भिल, संजय भिल, विठोबा भिल, संजय सोनवणे (सर्व रा.वराड बुद्रुक, ता.धरणगाव)अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची फिर्याद शरद आसवले(रा.आलेगाव पागा, ता.शिरूर)यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल मालचे(रा.खामखेडा, ता.धरणगाव)याने यापूर्वी गुऱ्हाळावर चांगले काम करून विश्वास संपादन केला होता.गुऱ्हाळावर कामगार आणतो, असे सांगून आठ कामगारांसाठी मे ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रत्येक कामगारांसाठी पन्नास हजार रुपयांप्रमाणे चार लाख रुपये शरद आसवले यांच्याकडून उचल घेतली तसेच फोन पेने एक लाख अठ्ठावीस हजार रुपये मागवून घेतले. संबंधित बाबीची नोटरी एरोंडल (ता. एरोंडल) येथे नोंद केली.त्यावर साक्षीदार म्हणून कुणाल ताराचंद मालचे व ईश्वर लक्ष्मण भिल यांनी सह्या केलेल्या आहेत.पैसे घेऊन देखील कामासाठी स्वतः अगर कामगारांना घेऊन तो आला नाही.फसवणूक झाल्याने शरद आसवले यांनी शिरूर ठाण्यात तक्रार दाखल केली.