पुणे : बारामती ॲग्रोकडून राज्यात सर्वाधिक 10 लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार

पुणे : राज्यात 17 डिसेंबर 2025 अखेर 408.63 लाख टन उसाचे गाळप आणि 344.26 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.42 टक्के आहे. राज्यात 93 सहकारी आणि 96 खाजगी अशा एकूण 189 कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. पुणे विभागात 17 सहकारी आणि 13 खाजगी असे एकूण 30 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत 101.05 लाख टन उसाचे गाळप करून 87.84 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 8.69 टक्के आहे.

आतापर्यंतच्या गाळपात पुण्याच्या बारामती ॲग्रोने 10 लाख 2 हजार 253 मे. टन ऊस गाळप करून राज्यात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ 8 लाख 29 हजार 660 मे. टन गाळप करून दौंड शुगर दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागच भारी ठरत असून, सरासरी 9.86 टक्के उतारा आहे. कोल्हापूर विभागात ३५ साखर कारखाने सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here