पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस पीक स्पर्धेतील कार्यक्षेत्र व परिसरातील बक्षीसपात्र शेतकरी व गावांना कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्षेत्रातील एका गावातुन १५ हजार टनापेक्षा जास्त व एकुण ऊसाच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या आणि एकरी १०० टनांहून अधिक ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. शिंगवे, काठापूर बुद्रुक, खडकी, आंबेगाव तालुक्यातील पारगाव, निरगुडसर, चांडोली बुद्रुक, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, भिमाशेत, करंदी, जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगळूर, साळवाडी, निमगाव सावा या गावांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात विजेत्या गावांना अनुक्रमे ६० हजार रुपये, ५० हजार रुपये, ४० हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. तर शेतकऱ्यांना अनुक्रमे ४० हजार रुपये, ३० हजार रुपये, २० हजार रुपये तसेच एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णु हिंगे, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर आस्वारे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, दिलीप कुरकुटे उपस्थित होते.