हिंजवडी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा २०२५-२६ या वर्षीच्या २८ व्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन सभारंभ मोठ्या उत्साहात झाला. कारखान्याचे संचालक उमेश बोडके व त्यांच्या पत्नी मोनिका, संचालक दत्तात्रय जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या हस्ते व देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे (इनामदार) यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, आमदार मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार मांडेकर यांनी कारखाना कार्यक्षेत्रात आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करुन कमी क्षेत्रांत जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्याची जबाबदारी संचालक मंडळाने पार पाडावी असे आवाहन केले.
मांडेकर यांनी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे शेतीक्षेत्र घटत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. संचालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, संचालक माउली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, ज्ञानेश नवले, चेतन भुजबळ, धैर्यशील ढमाले, धोंडिबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रय उभे, छबुराव कडू, यशवंत गायकवाड, संदीप काशिद, विलास कातोरे, भरत लिम्हण, अतुल काळजे, शिवाजी कोळेकर, लक्ष्मण भालेराव, संचालिका ज्योती अरगडे, शोभा वाघोले, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे, मोहन काळोखे आदी उपस्थित होते.