पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (इंदापूर) पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांनी रंगत आणली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वैयक्तिक लक्ष घालून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चार सभांनी रंगत आणली. यामुळे मतदार आता कोणाच्या हातात कारखान्याच्या चाव्या देणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांच्या शुक्रवारी (ता. १६) डोर्लेवाडी (ता. बारामती) व सणसरमध्ये सांगता सभा होणार आहे.
कारखान्याची निवडणूक श्री जय भवानीमाता पॅनेल व श्री छत्रपती बचाव पॅनेलमध्ये निवडणूक होत आहे. श्री जय भवानीमाता पॅनेलच्या प्रचाराची धुरा क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे सांभाळत आहेत. यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार स्वतः मैदानामध्ये उतरले आहेत. तर श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या प्रचाराची धुरा अविनाश घोलप आणि पॅनेल प्रमुख मुरलीधर निंबाळकर सांभाळत आहेत.
—