पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर छत्रपती कारखान्याने १२ टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व सभासदांनी कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी पाठवावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले. भवानीनगर येथे कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक साधारण सभेमध्ये ते बोलत होते. चालू वर्षी कारखाना सोमेश्वर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीने उसाचा पहिला हप्ता देणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझे ह्रदय बंद पडले तरीही चालेल. पण मी कारखाना बंद पडू देणार नाही. मी असेल, नसेल तरीही कारखाना चालला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्ष जाचक म्हणाले की, यंदा ऊस तोडणी नियमानुसार होणार आहे. हस्तक्षेप होणार नाही. १५ दिवस अदोगर ऊस तोडणी होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नोटीस बोर्डवरती लावली जातील. पूरग्रस्त भागामध्ये नुकसान झालेल्या ऊस तोडणीला प्राधान्य देणार आहे. सोमेश्वर व माळेगाव कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस नेणार नाहीत याची खात्री आहे. कारखान्याच्या काट्यावर वजन अॅक्युरेट असते. सोन्याचेही वजन केले तरीही वजनामध्ये फरक पडणार नाही. कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, अविनाश घोलप, उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक डॉ. योगेश पाटील, निंबाळकर, रामचंद्र निंबाळकर, ॲड.श रद जामदार, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, विठ्ठल शिंगाडे, तानाजी शिंदे, प्रशांत दराडे, अजित नरुटे, बाळासाहेब कोळेकर, अनिल काटे, सतीश देवकाते, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, मंथन कांबळे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर उपस्थित होते.