पुणे : छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांनी जाणून घेतली साखर उत्पादनाची प्रक्रिया

पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आले आहे. अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व संचालक अशोक पाटील यांनी यापूर्वीही कारखान्याचे संचालक म्हणून काम केले आहे. मात्र उर्वरित १९ संचालक हे पहिल्यांदाच संचालक झाले आहेत. या नवनिर्वाचित संचालक मंडळाने साखर कारखान्यामध्ये उसापासून तयार होणाऱ्या साखर उत्पादनाची प्रक्रिया जाणून घेतली. कारखान्यामध्ये साखर निर्मिती कशी होती याची माहिती होण्यासाठी कारखान्याचा प्रकल्प दाखविण्यात आला. गव्हाण, बॉयलर, मिल याची माहिती देण्यात आली.

कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या संकल्पनेतून सर्व संचालकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपत कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठल शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, मंथन कांबळे, योगेश पाटील, तानाजी शिंदे, अशोक जाधव, हनुमंत करवर, विकास क्षीरसागर, सुनील पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here