पुणे : शिरुर तालुक्यातील न्हावरा येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दादासाहेब फराटे यांचे संचालकपद अपात्र ठरविण्यात आले आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी दिलेल्या या निर्णयामुळे फराटे यांना पुढील पाच वर्षे कोणतीही सहकारी निवडणूक लढवता येणार नाही. फराटे हे २०२२ च्या निवडणुकीत निवडून आले होते, मात्र नामांकनाच्या वेळीच ते अपात्र असल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. दिलीप फराटे यांनी १९ मार्च २०२५ रोजी दादासाहेब यांच्या निवडीला आव्हान देणारी तक्रार साखर आयुक्तांकडे केली होती.
घोडगंगा कारखान्याची निवडणूक ०६ नोव्हेंबर २०२२ ला झाली. यामध्ये दादासाहेब फराटे संचालक म्हणून निवडून आले. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आले होते. २४ जानेवारी २०२५ला उच्च न्यायालयाने त्यांची अपात्रता कायम ठेवली. दिलीप फराटे यांनी १९ मार्च २०२५ ला प्रादेशिक सहसंचालकांकडे आपले आक्षेप दाखल केले होते. त्यानंतर साखर सहसंचालकांनी चार वेळा सुनावण्या घेतल्या. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक सहसंचालकांनी संचालक पद रद्द केल्याचा आदेश दिला आहे.
















