पुणे : यंदा मान्सून 12 दिवसाआधीच दाखल झाला असून सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅंटीग सुरू आहे. दरम्यान, पावसाचा फटका ऊस पिकाला बसला आहे. संपूर्ण शेतात पाणी शिरल्याने शेतीमध्ये तळ साचले असून शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे.
बारामतीमध्ये देखील नीरा कालवा धरण फुटल्याने बारामती शहरात पूरसदृश परिस्थिति निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे जाऊन पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पावसामुळे ऊस पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पेरणी पूर्व मशागतीची कामेही ठप्प झाली आहेत.