पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर (ता. इंदापूर) या साखर कारखान्यातील साखर गोडाऊन मधील ३४ हजार साखरेच्या पिशव्यांचा अपहार झाला असल्याचे दिसून येत असल्याने याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना दिले आहे. विशाल निंबाळकर, दत्तात्रय ढवाण, राजाराम काटे आदींच्या उपस्थितीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर गोडाऊन मधील साखर साठ्यातील ३४ हजार पिशव्या कमी दिसून येत आहेत. जनरल मिटींगच्या (सभेच्या) ठरावाप्रमाणे साखर कारखान्याने चौकशी करून कारवाई केली आहे का किंवा चौकशी झाली असेल तर त्याचा अहवाल सादर करून त्यावर काय कार्यवाही करणार आहात. व याबाबतची सर्व माहिती सभासदांना मिळावी हि विनंती करण्यात आली. विहित मुदतीत सदर चौकशी झाली नाही अहवाल सादर झाला नाही तर आम्ही सभासदांची जनजागृती करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.












