पुणे : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. आणि ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि. यांच्या सहयोगातून गाळप हंगाम सुरू करण्यात आला. माजी मंत्री आणि कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हंगामाचा प्रारंभ झाला. कर्मयोगी साखर कारखाना ही तालुक्याच्या प्रगतीची मातृसंस्था आहे. ओंकार शुगरच्या सहयोगातून शेतकरी आणि कामगारांचे हित सुरक्षित राहील. सर्व ऊस वेळेवर गाळप करून शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न केला जाईल. सहकार टिकवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास दोन्ही दृढ होणार आहेत असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने १०५० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचा टेंडर काढला असून, त्यातील ६५० कोटी लिटर साखर उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हा निर्णय उद्योग क्षेत्रासाठी दिलासादायक आहे. यावेळी ओंकार शुगर चेअरमनचे बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले की, या हंगामात १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास शेतकर्यांना जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर दिला जाईल.
शेतकऱ्यांच्या उसाचे १५ दिवसांत पेमेंट व कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देणे हे आमचे ब्रीद आहे. यावेळी जितेंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. नितीन भोसले यांनी सूत्रसंचालन केले. भूषण काळे यांनी आभार मानले.












