पुणे : ‘भीमा-पाटस’चे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची आमदार कुल यांची माहिती

पुणे : पाटस येथील भीमा- पाटस सहकारी साखर कारखाना गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा कारखाना पूर्णक्षमतेने ऊस गाळप करणार आहे. राज्यात अग्रगण्य स्थान राखत, शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे,’ अशी माहिती अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली. आमदार राहुल कुल व भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांच्या हस्ते कारखान्याच्या यंत्रसामग्रीसह मिल रोलरचे पूजन करण्यात आले.

आमदार कुल म्हणाले की, लवकरात लवकर गाळप हंगाम सुरू करण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही हंगामांप्रमाणे याही वर्षी कारखाना शेतकरी हिताचे धोरण अवलंबणार आहे. दरम्यान, कारखान्यात मिल रोलर पूजनानंतर सर्व मान्यवरांनी कारखान्याच्या यंत्रणा, कार्यपद्धती व नियोजनाचा आढावा घेतला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, संचालक नामदेव नाना शितोळे, एम. डी. फरगडे, बाळासाहेब तोंडे पाटील, अरुण भागवत, कार्यकारी संचालक रविकांत पाटील, तुषार पवार यांच्यासह संचालक, अधिकारी, शेतकरी व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here