पुणे : भीमाशंकर कारखान्यामध्ये गाळप हंगामाची पूर्वतयारी सुरु, मिल रोलरचे पूजन

पुणे : भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५- २६ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरू झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरू केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लान्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. दत्तात्रयनगर पारगाव येथील कारखान्यात सोमवारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमात आगामी गळीत हंगाम २०२५-२६च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करून जोडणीचे कामाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष शेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक संचालक तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगामामध्ये मागील ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने वेळेत गाळप पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार लवकरच सुरू करणार आहोत. यावेळी संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर इस्माईल इनामदार, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, वाहन प्रमुख किरण शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here