पुणे : येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया या संस्थेच्या (DSTA) अध्यक्षपदी सोहन एस. शिरगांवकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी एस.डी. बोखारे (महाराष्ट्र), एम. पटेल (गुजरात) आणि सी.जी. माने ( कर्नाटक) यांची निवड झाली आहे. संस्थेची त्रैवार्षिक निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.आर. कुलकर्णी, व्ही. एम. कुलकर्णी व डॉ. दशरथ ठवाळ यांनी काम पाहिले.
अध्यक्ष, उपाध्यक्ष व २१ कार्यकारिणी सभासद यांच्या निवडी २०२५ ते २०२८ पर्यंतच्या कालावधीसाठी झालेल्या आहेत. DSTA ही संस्था १९३६ मध्ये प्रसिद्ध उद्योजक वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलेली आहे. साखर उद्योगातील तंत्रज्ञान विकसित करणे, प्रसार करण्याच्या हेतूने गेली ८१ वर्षे कार्यरत आहे. साखर उद्योगातील तंत्रज्ञ, शेतकरी व शास्त्रज्ज्ञ मिळून सुमारे १२०० सभासद आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या तीन राज्याचे कार्यक्षेत्र आहे. या तीनही राज्यातील अनेक साखर कारखाने या संस्थेचे सभासद आहेत.