पुणे : सोमेश्वर कारखान्याच्यावतीने ५ लाख ५६ हजार क्विटल साखरेचे उत्पादन

पुणे : जिल्ह्यात चालू गळीत हंगामात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी देखील त्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. वाढवलेल्या गाळप क्षमतेमुळे चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने मार्च महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे. यंदाच्या गाळप हंगामात खासगी कारखाने ऊस गाळपात पुढे आहेत. मात्र, त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जास्तीचा साखर उतारा ठेवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. यापैकी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने शुक्रवारी (दि. २६) ५ लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करत ५ लाख ५६ हजार क्विटल साखर उत्पादन केले. तर निरा खोऱ्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती कारखान्याने साखर उताऱ्यात पाहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. सोमेश्वर कारखान्याने ११.६ चा साखर उतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्ह्यातील अनेक कारखाने कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून जादा ऊसदराचे आमिष दाखवत कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवत आहेत. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी ९.१२ टक्क्यांच्या सरासरी साखर उताऱ्याने ६० लाख ८४ हजार टन उसाचे गाळप करून ५३ लाख ४० हजार क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात बारामती ॲग्रो आणि दौंड शुगरने, तर साखर उताऱ्यात सोमेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोमेश्वर कारखान्याने मात्र साखर उताऱ्यात जिल्हात बाजी मारली आहे. ११.६ टक्के साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखाना अव्वलस्थानी आहे. १०.८१ टक्क्यांचा उतारा राखत छत्रपती दुसऱ्या आणि १०.८१ टक्के चा साखर उतारा ठेवत माळेगाव कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here