पुणे : दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा २२ वा मोळी पूजन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा अभिषेक तसेच गव्हाण व मोळी पूजन कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक, पांडुरंग राऊत व त्यांच्या पत्नी सुभद्रा राऊत या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजेने २०२५-२६ साठीचे गव्हाण पूजन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासतो. एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर देण्यात आला आहे. गळीतास आलेल्या उसाला कारखाना चांगला दर देणार आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी जाहीर केले.
यावेळी अध्यक्ष राऊत म्हणाले की, यंदाचा हंगाम हा आव्हानात्मक असणार आहे. हंगामात श्रीनाथ म्हस्कोबचे ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटावा म्हणून गाळप क्षमता वाढवली असून सर्व यंत्र सामग्री सज्ज आहे. अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास रासकर, उपाध्यक्ष योगेश ससाणे, संचालक अनिल बधे, अनिल भुजबळ, किसन शिंदे, ह.भ. प. हनुमंत शिवले महाराज, करण्यात आला. भगवान मेमाणे, मुकुंद दरेकर, कारखान्याच्या गळीत हंगाम चंद्रकांत ढमढेरे, लक्ष्मण कदम, सखाराम शिंदे, प्रमोद दरेकर, यशोधन रासकर, श्रेयाण केदारी, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, केन मॅनेजर सदाशिव टिळेकर, जनरल मॅनेजर टेक्निकल आर. एन यादव आदी यावेळी उपस्थित होते.


















