पुणे : जिल्ह्यात साखर कारखान्यांची क्षमता वाढली, मात्र ऊस गाळप घटले, १० कारखान्यांनी आटोपला हंगाम

पुणे: पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीत १५ पैकी १० सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यात जमा आहे. अनेक सहकारी साखर कारखान्यांनी प्रतिदिन गाळप क्षमता वाढवली. आपल्या मात्र, गेल्या तीन हंगामाचा आढावा घेतला असता असे दिसते की, एकेकाळी १४० ते १५० दिवस चालणारा गाळप हंगाम आता १०० दिवसांवर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. यावर्षी ९ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी गाळप केले. दररोज सरासरी एक लाख २६ हजार टन गाळप केले. मात्र, दैनंदिन गाळप क्षमता वाढूनही कारखान्यांचे एकूण गाळप दरवर्षी खालावत चाललल्याचे समोर आले आहे. यास बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव कारखान्याचा अपवाद आहे. या कारखान्यांचे गाळप मार्चपर्यंत चालेल असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली. बारामती अॅग्रोची गाळप क्षमता सर्वाधिक २० हजार टन प्रतिदिन आहे. त्यापाठोपाठ दौंड शुगर कारखान्याची प्रतिदिन १७५०० टन, भीमा पाटस कारखान्याची प्रतिदिन १० हजार रुपये टन आणि माळेगाव तसेच सोमेश्वर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ९ हजार टन आहे. श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याची क्षमता ५००० टन आहे. दैनंदिन गाळप क्षमता वाढली तरी उसाचे क्षेत्र मात्र तेवढेच राहिले. त्यामुळे गाळप हंगाम कमी दिवसाचा होत चालला आहे. कारखाने यावर्षी जानेवारी अखेरीस बंद झाल्याचे दिसत आहे. याबाबत दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले की, पूर्वी अतिरिक्त उसाचा प्रश्न असल्याने सर्व कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली. दौड शुगरने सन २०१७ मध्ये प्रतिदिन गाळप क्षमता ७००० असूनही १२ लाख टन गाळप केले होते. आता गाळप क्षमता अडीच पटीने वाढून देखील त्या तुलनेत गाळप वाढत नाही अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here