पुणे : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गेल्या ७३ दिवसांत ५ लाख ५९ हजार १४ टन उसाचे गाळप केले आहे. तर सहा लाख आठ हजार ६०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सध्या सरासरी साखरेचा उतारा ११.०३ टक्के झाला आहे. साखरेच्या उताऱ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये ०.८० टक्यांनी वाढ झाली आहे. जिल्हात दुसऱ्या क्रमांकाचा साखर उतारा आहे. कारखाना १६ जानेवारीपासून गाळपास येणाऱ्या सभासद व गेटकेनच्या उसाला सरसकट १०० रुपये प्रतिटन अनुदान देणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना अनुदानसह ३२०१ रुपये प्रतिटन उसाचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
कारखान्याकडील आडसाली ऊस ऊस तोडणीस विलंब होत असल्यामुळे सभासदांचे नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन कारखान्याने हा निर्णय घेतला आहे. यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सूचिता सपकळ, अशोक जाधव व हनुमंत करवर उपस्थित होते.

















