पुणे : एमआरएन-भीमा पाटस साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन ४२ दिवस झाले. या कालावधीत कारखान्याने २,५७,००० टन ऊस गाळप केला. आतापर्यंत दोन लाख ३४ हजार ८५० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. साखर उतारा १०.२४ इतका आहे. कारखाना व्यवस्थापनाने १५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा केले. यंदा १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर शुक्रवारी (ता. १२) ३१०० रुपये प्रतिटन दराप्रमाणे रक्कम जमा केले आहेत. यंदाही इतर कारखान्यांच्या बरोबरीने उसाचा दुसरा हप्ता दिला जाईल, अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली.
कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी सांगितले की, जर दैनंदिन ऊस तोडणी वाहतुकीमध्ये काही अडचण आली नाही, तर दररोज दहा हजार टनाप्रमाणे उसाचे गाळप होणार आहे. यंदाचा हा ४३ वा गळीत हंगाम आहे. एक नोव्हेंबरला हंगामाची सुरवात झाली. यंदा प्रथमच कारखान्याने प्रतिदिन १० हजार दोनशे ४९ टन गाळप करून विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात दहा हजार टनांपेक्षा जास्त गाळप झाले आहे. कारखाना इतरांच्या बरोबरीने ऊस दर देईल.

















