पुणे : वजनकाटा तपासण्यासाठी छत्रपती कारखान्याच्या अध्यक्ष्यानी स्वतःचे वजन करत केली खात्री

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर सोन्याचे जरी वजन केले तरी वजन अचूक भरेल, असे कारखान्याच्या चोख कामकाजाबाबत अध्यक्ष पृथ्वीराज जाचक सांगत आले आहेत. सोमवारी जाचक यांनी अचानक कारखान्याच्या वजन काट्यावर स्वतः चे वजन चेक केले आणि वजन अचूक भरले. ‘वजन चोख, पैसे रोख’ या त्यांच्या ब्रीदप्रमाणे छत्रपती कारखान्याचा वजन काटा अचूक असून कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी पृथ्वीराज जाचक हे कायम आग्रही असतात, याचेच हे उदाहरण आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. कारखान्याचा उसाचे वजन करणारा काटा हा चोख असल्याने कारखाना व अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावर सर्व ऊस उत्पादक सभासदांचा मोठा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आजपर्यंत पृथ्वीराज जाचक यांनी केले आहे. म्हणूनच त्यांनी कारखान्यांमध्ये जाऊन अचानक वजन काटा चेक केला. ४४ दिवसांमध्ये कारखान्याचे ३ लाख २८ हजार ४२९ टन गाळप झाले असून रिकवरी साधारण १०.१२ एवढी आहे. कारखान्याचे १२ लाख टन ऊस गाळपचे उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here