पुणे : राज्यात 23 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असल्याने 21 तारखेला विधानसभेसाठी होणार्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी राज्यात पावसाची शक्यता आहे. 21 ऑक्टोबरला कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठीकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 ऑक्टोबरला ही कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठीकाणी तर विदर्भात तुरळक ठीकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशासह राज्यातून मागील आठवड्यात मान्सूनने परतीचा प्रवास पूर्ण केला. जुलैमधील झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणात 90 ते अगदी 100 टक्के पाणीसाठा झाला. परतीचा पाउस थांबला असे वाटलेले असतानाच शुक्रवारी (दि.18) रात्रीपासून काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. याबराबेरच पुढील 48 तासात पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीय स्थितीचा प्रभाव वाढणार आहे. यामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातुर आणि मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाउस पडणार आहे.
पुढच्या तीन दिवसात राज्यातील मध्य पूर्व अरबी समुद्रापासून ते कर्नाटक, केरळच्या किनारपट्टीपर्यंत ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.


















