राजारामबापू कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी सणासाठी ८ कोटी ३७ लाख वर्ग : अध्यक्ष प्रतीक पाटील

सांगली : प्रतीक पाटील युनिटकडे गळीत राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी हंगाम सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसापोटी दिवाळी सणासाठी एकूण रुपये ८ कोटी ३७ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये १३ लाख ७२ हजार २८१ मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये ६ लाख ७३ हजार ४३२, वाटेगाव सुरूल युनिटमध्ये ३ लाख ९८ हजार ५९३, कारंदवाडी युनिटमध्ये ३ लाख २५५ टन उसाचे गाळप केलेले आहे.

साखराळे, वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास आलेल्या उसास पहिला हप्ता प्रतिटन रुपये ३ हजार २०० प्रमाणे एकूण रक्कम रुपये ४३९ कोटी १२ लाख इतकी रक्कम ऊस बिलापोटी अदा केलेली आहे. सध्या दिवाळी सणासाठी ८ कोटी ३७ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत.

गळीत हंगाम सन २०२५-२६ करिता साखराळे युनिटमध्ये ९ लाख ५० हजार, वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये ५ लाख ५० हजार व कारंदवाडी युनिटमध्ये ४ लाख ५० हजार, तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये ३ लाख ५० हजार असे एकूण २३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चीफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here