खम्मम : बीआरएसचे (Bharat Rashtra Samithi) संसदेतील नेते नामा नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील खासदारांचा सहभाग होता. त्यांनी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली आणि आपापल्या राज्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. खासदारांच्या समुहाने सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपापल्या राज्यात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारने पिकांसाठी निश्चित केलेला योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) उत्पादन खर्चाच्या पेक्षा खूप कमी आहे. खासदारांनी मंत्री तोमर यांच्याकडे एफआरपीचा दर ३०५ रुपयांवरुन वाढवून ३५० रुपये करण्याची मागणी केली आहे.












