अहमदनगर : स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत सांस्कृतिक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०१ जणांनी रक्तदान करत भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ प्रमुख उपस्थित होते.
ओहोळ म्हणाले, काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम सामाजिक बांधीलकी राखत विविध उपक्रम राबविले आहेत. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारखान्याने नेहमी वाटचाल केली आहे. यावेळी उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कारखाना कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांच्यासह किरण कानवडे, शरद गुंजाळ, अशोक कवडे, सागर गांगुर्डे, अभिजित कुलकर्णी, शीतल हटक, प्रिया गायकवाड, पुष्पा बंद राजेंद्र बड, राजू कोल्हे आदी उपस्थित होते.












