सांगली : ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर १६ रायगाव साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५-२६ च्या १५ डिसेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन ३४०० रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर जितेंद्र माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.चालू गळीत हंगामच्या १५ डिसेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या उसाचे प्रति मेट्रिक टन ३४०० रुपयांप्रमाणे बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षमपणे सुरु आहे.
जिल्ह्यामध्ये ओंकार युनिट नंबर १६ कारखान्यास गाळपास येणाऱ्या उसास उच्चांकी भाव दिल्याने व अचूक वजन काटा असल्याने शेतकऱ्यांची या कारखान्यास ऊस गाळपास देण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. ओंकार ग्रुप नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधत गाळपास आलेल्या उसाची बिले वेळेवर देण्याची परंपरा कायम ठेवत आहे. कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऊस या कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे बाबुराव बोत्रे-पाटील यांनी आवाहन केले.
















