सांगली : सोनहिरा कारखान्यात ११० दिवसांमध्ये ९.७३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप

सांगली : सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला वेळेवर गाळप, योग्य नियोजन आणि विश्वासार्ह व्यवस्थापन देण्यात डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे प्राधान्य राहिले आहे. त्यामळे यंदाचा गळीत हंगाम कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय पूर्ण करण्यात यश आले आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने एकूण ११० दिवस गाळप करत ९ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी दिली. कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी आयोजित पोती पूजन कार्यक्रमात बोलत होते.

कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता प्रसंगी कारखान्याच्यावतीने ऊस तोडणी कंत्राटदार तसेच हार्वेस्टिंग मशिन मालकांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या परिश्रमांबद्दल आमदार कदम यांनी त्यांचे कौतुक केले. तोडणी, वाहतूक आणि यांत्रिकीकरण यामधील योग्य समन्वयामुळे ऊस वेळेत कारखान्यापर्यंत पोहोचला, त्यामुळे गाळप प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत, याची विशेष दक्षता घेण्यात आली असे ते म्हणाले. दिलीपराव सूर्यवंशी, पी. सी. जाधव, पंढरीनाथ घाडगे, बापूसो पाटील, युवराज कदम, सयाजी धनवडे, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, संभाजी जगताप, शिवाजी काळेबाग, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here