सांगली : कृष्णा कारखाना- कृष्णा हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी, उपचार शिबिराचे आयोजन

सांगली : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना व कृष्णा हॉस्पिटल यांच्या विद्यमाने ऊसतोड कामगार व माता-बालक आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले. १७० जणांची आरोग्य तपासणी व मोफत उपचार करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार आरोग्य तपासणीयांच्या हस्ते उद्घाटन झाले.

सुतार म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले नेहमीच ऊसतोड मजुरांसाठी अनेक उपक्रम राबवित असतात. ऊसतोड मजुरांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. काम करत असताना शरीराची काळजी घेऊन काम केले पाहिजे. यावेळी पंकज दादासाहेब शेळके, पाटील उपस्थित होते. डॉ. हर्षल निकम, डॉ. सचिन जगताप, डॉ. आरगो स्वामी, डॉ. सर्वेश दिक्षित, डॉ. शुभम शहा, डॉ. साई चरण, डॉ. श्रेया कतारे, शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे, अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here