मिरज : मोहननगर-आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन नुकतेच उत्साहात करण्यात आले. कारखान्याचे ज्येष्ठ सभासद भानुदास कुंडले व सुनीता कुंडले यांच्या हस्ते बॉयलरचे पूजन झाले. भगवान आवळे व पंकजा आवळे यांच्या हस्ते धार्मिक होम विधी पार पडला. येत्या २०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखाना पाच लाख टन उसाचे गाळप करणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे- म्हैसाळकर यांनी केली.
अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे म्हणाले, “कारखान्यातील यंत्रसामग्री दुरुस्तीचे काम; तसेच अंतर्गत तयारी पूर्ण झाली आहे. शेती विभागाने ऊस नोंदीची प्रक्रिया, तोडणी वाहतूक करार पूर्ण केले आहेत. त्यामुळे गाळप हंगामाची सर्व तयारी झाली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण परिपक्व ऊस कारखान्यास पाठवावा. कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष परसाप्पा पाटील, संचालक अशोक वडगावे, अण्णासो पिड्डे, वसंत मगदूम, महादेव मोरे, सुरेश कुंभार, बाहुबली पाटील, सलीम सौदागर, अरुण सूर्यवंशी, पांडुरंग माने, अण्णासाहेब कुरणे, विजयसिंह भोसले, मोहन शिंदे, शिवाजीराव पाटील, आप्पासो खोत, वसंत शिंगाडे, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, चिफ इंजिनिअर रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.