सांगली : सोनहिरा कारखान्याकडून ३३०० रुपयांहून अधिक ऊसदराची आमदार विश्वजित कदम यांची घोषणा

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने साखर उत्पादन व विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही चांगल्या प्रकारे चालवले आहेत. कारखाना चालू गळीत हंगामात कारखाना १४ लाख टन उसाचे गाळप करणार आहे. हंगामात १३ लाख टनाहून अधिक झाल्यास प्रतिटन ३३०० रुपयाहून अधिक ऊसदर देईल. त्यापुढे जेवढे उच्चांकी गाळप, तेवढा उच्चांकी दर दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या २०२५-२६ च्या २६ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कारखान्याने विक्रमी ऊस उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी ‘ए आय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. थेट बांधावर जाऊन मार्गदर्शनही केले जात आहे असेही त्यांनी सांगितले.

आमदार विश्वजित कदम म्हणाले की, कारखान्यातील सर्व कामगारांना १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर सिंचन योजनांची पाणीपट्टी अन्य कारखाने कपात करणार नसतील तर ‘सोनहिरा’ ही कपात करणार नाही. जेवढे उच्चांकी गाळप, तेवढा उच्चांकी ऊस दर देण्यास कटिबद्ध आहे. फेब्रुवारीपासून ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपास येईल, त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. यावेळी आमदार कदम व त्यांच्या पत्नी स्वप्नाली यांच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ झाला. खासदार विशाल पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, संचालक शांताराम कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, संचालक दीपक भोसले उपस्थित होते. कार्यकारी संचालक एस. एफ. कदम यांनी स्वागत केले. यावेळी संचालक रघुनाथराव कदम, शांताराम कदम, जितेश कदम, दिगंबर जाधव, ऋषिकेश लाड, विजयकुमार चोपडे, सतीश पाटील, संचालक भीमराव मोहिते, बापूसो पाटील, पी. सी. जाधव, महेश कदम, मालन मोहिते, सरपंच संतोष करांडे, इंद्रजित साळुंखे, सुनील पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here