सांगली : दत्त इंडिया कारखान्याचे यंदा ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदा अकरा लाख टन गाळप करेल, अशी घोषणा श्री दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युजय शिंदे यांनी केली. दत्त इंडिया कंपनी संचलित वसंतदादा साखर कारखान्याचे रोलर पूजन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी दत्त इंडियाचे जितेंद्र दारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांच्यासह कारखान्यांचे सर्व नूतन संचालक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. आगामी गाळप हंगामासाठी सर्व संचालकांनी सर्वाधिक ऊस कारखान्यास गाळपासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती उपाध्यक्ष शिंदे यांनी संचालकांना केली.

यावेळी उपाध्यक्ष मृत्यूंजय शिंदे यांच्या हस्ते नूतन संचालकांचे स्वागत करण्यात आले. दत्त इंडिया कंपनीचे जितेंद्र धारू यांच्या वाढदिवसानिमित्त साखर कारखान्यावर रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्त इंडियाचे शरद मोरे, अमोल शिंदे, भरत तावरे, विष्णुपंत जकाते, संदीप वाघ, मोहन पवार, प्रदीप शिंदे आदींसह संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here