सांगली : ‘श्रीपती शुगर’च्या कर्मचाऱ्यांनी घेतली औद्योगिक सुरक्षेची शपथ

सांगली : श्रीपती शुगरच्या कर्मचाऱ्यांनी औद्योगिक सुरक्षेची शपथ घेतली. ५५ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेची शपथ घेतली.

सुरक्षितता, आरोग्य, पर्यावरणाच्या पालनासाठी स्वतःला पूर्ण वाहून घेऊन स्वतः व कुटुंबाच्या, कारखान्याच्या, समाजाच्या व देशाच्या हितासाठी, प्रयत्न करू, अशी शपथ घेतली. ४ ते ११ मार्च या सुरक्षा सप्ताहात श्रीपती शुगरमध्ये कामगारांसाठी निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल मॅनेजर महेश जोशी, रंजीत जाधव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here