सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने व्हीएसआय (मांजरी बुद्रुक, पुणे) या शिखर संस्थेच्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबिरास कारखाना कार्यक्षेत्रातील ३५ शेतकऱ्यांना पाठविण्यात आले. त्यांना शुभेच्छा देताना शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी तरुण, प्रगतशील शेतकऱ्यांनी व्हीएसआय (मांजरी बुद्रुक) येथील प्रशिक्षण काळात जे अद्ययावत तंत्रज्ञान व आधुनिक माहिती दिली जाईल, ती आत्मसात करा. तिचा शेतात वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी जुनेखेड, बोरगाव, आष्टा, कारंदवाडी, शिगांव, बावची, कुरळप, करंजवडे, कार्वे, ढगेवाडी, इटकरे, ओझर्डे, वाटेगाव, पेठ, नेर्ले, सुरुल, रेठरेहरणाक्ष, पडवळवाडी, कुंडल, दह्यारी, तुंग, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान, दुधगांवातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणास पाठविण्यात आले.
विठ्ठल पाटील म्हणाले, ‘माजी मंत्री आमदार जयंत पाटील व कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील हे तरुण व प्रगतशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नशील आहेत. वाळवा तालुक्यातील सर्व तरुण शेतकरी काही दिवसांत शेती व शेतकऱ्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. यावेळी सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, इरिगेशन ऑफिसर जे. बी. पाटील, वाहन विभाग प्रमुख सुनील जाधव, कामगार सोसायटीचे उपाध्यक्ष किरण बाबर उपस्थित होते. अजिंक्य जाधव, रवींद्र खोत, जगदीश पाटील, किरण घारे- पाटील, धनंजय पाटील, मालोजी पाटील, अभिजित पाटील, रणजित कदम, विकास कदम आदी सभासद प्रशिक्षणाला रवाना झाले.