सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांशी थेट संवाद करण्यासाठी २२ गावांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कारंदवाडी येथील मेळाव्यात कारखान्याच्या शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मार्गदर्शन केले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्या आपल्या कार्यक्षेत्रातील क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम आ. जयंत पाटील व कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. कारंदवाडी येथील शेतकरी सातत्याने शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत उच्चांकी उत्पादन घेत आहेत,असे शेती समिती अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
जे. बी. पाटील म्हणाले, जमीन सुधारण्यासाठी कारखान्याने राजारामबापू सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना आणली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. संचालक रमेश हाके यांनी स्वागत केले. माजी संचालक श्रेणीक कबाडे यांनी आभार मानले. ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, संचालक रमेश हाके, ज्येष्ठ संचालक रघुनाथ जाधव, माजी संचालक श्रेणीक कबाडे, ऊस विकास अधिकारी सुजकुमार पाटील, जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील उपस्थित होते.