सांगली : राजारामबापू साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटच्या वजनकाट्याची तपासणी

सांगली : सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची भरारी पथकाने तपासणी केली. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटचे वजनकाटे अचूक असल्याचा अहवाल भरारी पथकांनी दिला आहे. भरारी पथकाने प्रथम कारंदवाडी युनिट कार्यस्थळावरील चाळीस टनी दोन आणि दहा टनी दोन वजन- काट्यांची तपासणी केली. यानंतर भरारी पथकाने वजनकाट्यावर उसाचे वजन करून गव्हाणीकडे गेलेली ट्रॅक्टर, अंगद व बैलगाड्या आदी वाहने परत बोलावून त्यांची पुन्ह वजने घेतली. या सर्व वाहनांची वजने आणि वजन काटे अचूक असल्याच भरारी पथकाने राजारामबापू साखर कारखान्यास अहवाल दिला आहे.

वैधमापन निरीक्षकांसह शासनाच्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या भरारी पथकाने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटला अचानक भेट देत वजन काट्यांची कारखान्याच्या तपासणी केली. भरारी पथकात उरुण – ईश्वरपूर विभागाचे वैधमापन निरीक्षक योगेश आगरवाल, लेखा परीक्षक श्रेणी २ सांगली, संजय कारेकर, आष्टा पोलिस स्टेशनचे प्रशांत जाधव, महसूल सेवक रमेश‍ रसाळ यांचा भरारी पथकात समावेश‍ होता. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील, ऊस उत्पादक शेतकरी सुनील मस्के, कारखान्याचे डेप्युटी चीफ इंजिनिअ‍ संग्रामसिंह चव्हाण, केन यार्ड सुपरवायझर विजय पाटील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here