सांगली : क्रांतिअग्रणी लाड सहकारी साखर कारखान्याकडून फळझाडांच्या रोपांची विक्री सुरू

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाकडील फळझाडांच्या रोपांचा विक्री प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते झाला. आंबा, केशर, चिक्कू कालीपत्ती, नारळ बाणवली, जांभूळ बहाडोली, आवळा, सुपारी, दालचिनी, लिंबू, पेरू, सोनचाफा दालचिनी, लिंबू, पेरू, सोनचाफा अशा विविध जातींच्या रोपांची आयात सालाबादप्रमाणे याही वर्षी करण्यात आली आहे. कारखान्याच्या नर्सरी विभागाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, कारखान्याचा नर्सरी विभाग मोठा आहे. ऊस रोपांची निर्मिती कारखान्याकडून जादा प्रमाणात करण्यात येते. परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या बांधावर तसेच घराशेजारी फुल व फळझाडांची लागवड करायची असल्यास कारखान्याच्या माध्यमातून उत्तम प्रतीच्या रोपांची उपलब्धता करण्यात येते. तशी विविध रोपांची उपलब्धता करण्यात आली आहे. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, इतर विभागांचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here