सांगली : कृष्णा कारखान्यातर्फे स्थलांतरित ऊस तोडणी मजुरांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण

सांगली : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्थलांतरित ऊस तोडणी मजुरांसाठी आयुष्यमान भारत कार्डचे वितरण उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक बाबासो शिंदे, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका साळुंखे, डॉ. राजकुमार पवार, बाजीराव सुतार, दादासाहेब शेळके, सुयोग खानविलकर, डॉ. हर्षल निकम, तातोबा थोरात, राधिका लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जगदीश जगताप म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याशी संबंधित पात्र स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बाजीराव सुतार म्हणाले, साखर उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कष्टकरी कुटुंबांना आरोग्य सुरक्षा व आवश्यक सहाय्य प्रदान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी साखर शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here