सांगली : क्रांती कारखान्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त व्याख्यान, आरोग्य शिबिरासह विविध उपक्रम

सांगली: क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त कारखान्याच्या प्रांगणात सुरक्षा ध्वजारोहण करण्यात आले. कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजारोहण करण्यात आले. कामगारांना सुरक्षेची शपथ देण्यात आली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार अरुणअण्णा लाड तसेच अध्यक्ष शरद लाड हे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत दक्ष असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात ‘शून्य अपघात’ धोरण प्रभावीपणे राबविले जात आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी दिली.

औद्योगिक सुरक्षा अधिकारी विशाल पवार यांनी कामगारांना सुरक्षेची शपथ दिली. कारखान्यातर्फे यावर्षीही कर्मचाऱ्यांसाठी ‘सुरक्षितता मित्र कामगार’ व ‘सुरक्षितता मित्र अधिकारी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यानिमित्त विशेष व्याख्यान, आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, सचिव वीरेंद्र देशमुख, मुख्य अभियंता आशिष चव्हाण, मुख्य रसायन तज्ज्ञ किरण पाटील, स्थापत्य अभियंता महादेव माने, भांडारप्रमुख उदय लाड, मुख्य समयपाल शंकर पवार, कार्यालयीन अधीक्षक अविनाश लाड, सुरक्षा अधिकारी कुंडलिक लाड, उपमुख्य अभियंता प्रमोद पाटील, बाळासाहेब पाटील, सचिन माळी, अमित कस्तुरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here