सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने साखर उद्योगात दिलेल्या योगदानाबद्दल दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) या संस्थेच्यावतीने ‘बेस्ट शुगर फॅक्टरी’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे येथील शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण झाले. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. याच कार्यक्रमात कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत लक्ष्मण पाटील यांना आऊट स्टैंडिंग परफॉर्मन्स इन शुगर इंडस्ट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अध्यक्ष प्रतिक पाटील म्हणाले की, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे मार्गदर्शन तसेच राजारामबापू साखर कारखान्याचे अधिकारी, कामगारांच्या योगदानातून हे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतकांचे मुख्य योगदान आहे. या पुरस्कारांनी आमची जबाबदारी वाढली आहे. यावेळी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहेल शिरगावकर, गुजरातचे उपाध्यक्ष एम. के. पटेल, तांत्रिक उपाध्यक्ष एस. डी. बोकारे, कारखान्याचे सचिव डी. एम. पाटील, जनरल मॅनेजर (वर्क्स) विजय मोरे, जनरल मॅनेजर सुनील सावंत, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, चिफ केमिस्ट संभाजी सावंत, पर्यावरण अधिकारी आर. एस. पाटील, तेजस्विनी पाटील, आयुश पाटील उपस्थित होते.