सांगली: राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ऊस विकास क्षेत्रात जे काम केले आहे, त्याचा भारतीय शुगरतर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय ऊस विकास पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. भारतीय शुगरचे सीईओ संग्रामसिंह शिंदे, अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन पुरस्कार निवडीचे पत्र दिले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट संतोष खटावकर, अशोक खोत उपस्थित होते. संतोष खटावकर यांना बेस्ट चिफ अकौंटंट, तर अशोक खोत (इस्लामपूर) यांना राष्ट्रीय ऊस उत्पादक पुरस्कार घोषित करण्यात आला. कारखान्याला यापूर्वी ‘व्हीएसआय’, राष्ट्रीय साखर संघातर्फे ‘राज्यातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना’सह उत्तम ऊस विकास, उत्तम आर्थिक नियोजन, उत्तम तांत्रिक क्षमता आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
साखराळे युनिटमध्ये रोलर पूजन उत्साहात…
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी आम्हाला जे कष्ट घ्यावे लागतील, ते आम्ही घेऊ, असे प्रतिपादन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या साखराळे युनिट कार्यस्थळी गळीत हंगाम २०२५-२६ चे रोलर पूजन पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत साखर उद्योगातील तीव्र स्पर्धा व येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात आहे. त्यातून मार्ग काढून आम्ही भरारी घेऊ असे ते म्हणाले. रोलर पूजन कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, अमरसिंह साळुंखे, डॉ. सौ. योजना शिंदे-पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, राज्य प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राष्ट्रीय साखर कामगार संघाचे कार्याध्यक्ष तानाजी खराडे, संचालक शैलेश पाटील, प्रताप पाटील, दादासो मोरे, रमेश हाके, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, रामराव पाटील, वैभव रकटे, दिलीपराव देसाई, राजकुमार कांबळे, हणमंत माळी, मनोहर सन्मुख, विकास पवार, सचिव डी. एम. पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.