सांगली : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद लाड म्हणाले, “येणाऱ्या गळीत हंगामात आपण अधिकाधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून साखर तसेच अन्य प्रकारच्या उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी ऊस विकास विभागाच्यावतीने ऊस बेणे, औषधे, खते व मोफत सल्ला देत आहोत. तरी शेतकऱ्यांनी जवळच्या गट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या ऊसाची नोंद करून जास्तीत जास्त ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे.
या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, माजी उपाध्यक्ष पोपट संकपाळ, संचालक दिलीप थोरबोले, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, सतीश चौगुले, शीतल बिरनाळे, सुकुमार पाटील, वैभव पवार, संजय पवार, प्रभाकर माळी, अश्विनी पाटील, अंजना सूर्यवंशी, रामचंद्र देशमुख, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, अविनाश माळी, बाळकृष्ण दिवाणजी, अशोक विभूते, सुभाष वडेर, विजय पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.