सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या कंपोस्ट विक्रीस युवा नेते दिग्विजय कदम व कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कारखान्याच्या वतीने दरवर्षी प्रेसमडवर प्रक्रिया करून कंपोस्ट सभासद शेतकऱ्यांसाठी विक्रीस खुले केले जाते.
यावेळी दिग्विजय कदम म्हणाले, कारखान्याने कायम सभासदांचा व शेतकऱ्यांचा विचार करून धोरणे राबविली आहेत. सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस गळीत करण्यास कारखाना प्रशासन कटिबद्ध आहे. तरी कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गळितासाठी कारखान्यास पाठवावा.” यावेळी कारखान्याचे संचालक सयाजी धनवडे, आनंदराव पाटील, विजय मोहिते, कैलास माने, पर्यावरण अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी, उल्हास कदम, गणपतराव कदम व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.


















