सांगली : निनाईदेवी कारखान्यात डालमिया शुगरकडून ऊस तोडणी वाहतूक करार सुरू

सांगली: निनाईदेवी कारखाना-डालमिया शउगरने युनिट हेड संजीव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मागील हंगाम यशस्वीरित्या पार पडला. राज्यात सर्वप्रथम डालमिया शुगर ने गळीत हंगाम संपल्यावर शेतकऱ्याची व तोडणी वाहतुकदारांची बिले अदा केली आहेत. येत्या सात दिवसात कारखाना तोडणी व वाहतूकदारांचे कमिशन बिलेही खात्यावर जमा करणार आहोत, अशी माहिती कारखान्याचे केन हेड सुधीर पाटील यांनी दिली. निनाईदेवी कारखान्याच्या २०२६-२०२७ या गळीत हंगामाचा करार प्रारंभ कारखान्याचे युनिट हेड संजीव देसाई यांच्या मार्गदर्शनखाली झाला. यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी वाहतूक कंत्राटदारांना ऊसतोडणी वाहतूक करारपत्र कारखान्याचे केन हेड सुधीर पाटील, एचआर मॅनेजर महेश कवचाळे देण्यात देऊन सत्कार करण्यात आला. केन हेड सुधीर पाटील यांनी तोडणी मजुरांची टोळी करताना पडताळणी करूनच करार करावेत, असे आवाहन केले. वाहतूक कंत्राटदार शंकर पाटील, रोहन जाधव यांनी मनोगत केले. ऊस विकास अधिकारी, युवराज चव्हाण, सिक्युरिटी ऑफिसर राजेंद्र नाईक, ऊस पुरवठा अधिकारी नरेश देशमुख आदी उपस्थित होते. ऊसविकास अधिकारी युवराज चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. युनियन अध्यक्ष निवृत्ती नायकवडी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here