सातारा : अजिंक्यतारा कारखान्याला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला भारतीय शुगर्स संस्थेने सर्वोत्कृष्ट साखर कारखाना राष्ट्रीय पातळीवरील (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. रोख एक लाख रुपये, ट्रॉफी व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूरमध्ये १८ जुलैला पुरस्काराचे वितरण होणार आहे. भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी ही माहिती दिली.

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्याची दखल घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २९ पुरस्कार मिळालेले आहेत. या जाहीर झालेल्या ३० व्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. याबाबत जिवाजी मोहिते म्हणाले की, कारखान्याने सुरुवातीपासून शेतकऱ्यांचे हित जोपासलेले आहे. कारखान्याची दैनंदिन क्षमता ४५०० मेट्रिक टन, आसवनी क्षमता ४५ हजार लिटर्स केली आहे. शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट वेळेत देण्याची परंपरा राखली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here