सातारा : ‘ग्रीन वर्ल्ड को- प्राइड’ पुरस्काराने अजिंक्यतारा कारखान्याचा गौरव

सातारा : ‘ग्रीन वर्ल्ड को प्राइड २०२५’ या पुरस्काराने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गौरव केला आहे. पुणे येथील समारंभात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्काराने कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे मत कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी व्यक्त केले. कारखान्याच्या या उल्लेखनीय कामकाजाची नोंद घेऊन केंद्र व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार कारखान्याला प्राप्त झाले आहे असे त्यांनी सांगितले.

अजिंक्यतारा कारखान्याने ऊस उत्पादकांना दिलेले ऊस बिल, साखर उत्पादनातील गुणवत्ता, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था आणि कारखाना व्यवस्थापनातील पारदर्शकता या बाबींचा विचार करून कारखान्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कारखान्याचे कामकाज नियोजनबद्ध व शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून यशस्वीपणे सुरू आहे, असे मोहिते यांनी सांगितले. याला साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे व ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौरव कोतवाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here