सातारा : अथणी शुगर्स- रयतकडून ऊस उत्पादकांना प्रति टन ३५०० रूपये अदा

सातारा : शेवाळेवाडी (म्हासोली, ता. कराड) येथील अथणी शुगर्स लि. (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कारखान्याने १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप केलेल्या ऊसाचे प्रति मेट्रीक टन ३५०० या दराने ऊस बिल थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. तसेच तोडणी व वाहतूक बिलेही अदा करण्यात आली आहेत.

चालू हंगामात आजअखेर कारखान्याने ३,१३,६२० मेट्रीक टन ऊस गाळप करत सरासरी ११.४९ टक्के साखर उताऱ्यासह ३,५३,३७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण झाले असून वाढीव क्षमतेने गाळप सुरू आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला आहे. चालू हंगामात गाळपास येणाऱ्या संपूर्ण ऊसाचे पेमेंट दर पंधरवड्याला एकर कमी अदा केले जाईल, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील केले असून त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here