सातारा : अजिंक्यतारा – प्रतापगड समूहाला सहकार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

सातारा : प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जावळीसारख्या दुर्गम भागातील बंद असलेला साखर कारखाना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने व अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. याचा शेतकरी सभासदांना नक्की फायदा होईल. अडचणीत असलेल्या कारखान्याला केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक मदत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष शिंदे यांना दिले.

यावेळी अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी संचालक राजेंद्र फरांदे ऊर्फ दादा पाटील, अजिंक्यताराचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही कारखान्यांच्या वतीने सौरभ शिंदे यांनी सत्कार केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अडचणींवर मात करून कारखाना सुरू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे व सौरभ शिंदे यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने प्रयत्न केले. शिवेंद्रसिंहराजे हे मंत्रिमंडळात आमचे जवळचे सहकारी आहेत. अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग या सहकारातील भागीदारीला सहकार्य करणार. “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here