सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले व आमदार, डॉ. अतुल भोसले यांनी प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रति शेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती कारखाना दरवर्षी करत आहे. यंदा या उपक्रमात पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक तसेच वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियोजनानुसार सभासदांना साखरेचे वितरण होणार आहे.
कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, वैभव जाखले, जनरल मॅनेजर बालाजी पबसेटवार, जयवंतराव भोसले, कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. इस्लामपूरमध्ये संचालक संजय पाटील यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. इस्लामपूरचे माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, विश्वास पाटील, शैलेश पाटील, शंकर पाटील, महेश जाधव, संपत पाटील उपस्थित होते.